esakal | बारामती : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणारा बिबट्या अखेर आज सकाळी जेरबंद झाला.

बारामती : अखेर 'तो' बिबट्या जेरबंद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : गेल्या अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणारा बिबट्या अखेर आज सकाळी जेरबंद झाला. काटेवाडी येथे आज वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये ही बिबट्याची मादी सापडली आहे. आज सकाळपासूनच लोकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वनविभागाने या बिबट्याला ताब्यात घेतले आहे. काटेवाडी येथे सापडलेला हा तिसरा बिबट्या आहे. संतोष जाधव यांच्या शेतामध्ये हा बिबट्या सापडला. यापूर्वीदेखील दोन बिबटे याच ठिकाणी वनविभागाने जेरबंद केले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मध्यंतरी कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे लोकांना बिबट्याचा वावर असल्याचा विसर पडला होता. आज अचानकच वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये सकाळी हा बिबट्या सापडल्याने परत एकदा खळबळ माजली होती. मात्र हा बिबट्या जेरबंद झाल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बारामती तालुक्यातील बिबट्यांचे अस्तित्व या निमित्ताने आता संपुष्टात आले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा