कोंबरवाडी येथे बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद 

अर्जुन शिंदे, आळेफाटा
मंगळवार, 26 जून 2018

आळेफाटा : कोंबरवाडी (बेल्हे) ता. जुन्नर येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता. २६) पहाटेच्या सुमारास सुमारे अडीच वर्षे वयाची एक बिबट्याची मादी जेरबंद झाली. कोंबरवाडी (बेल्हे) येथे यादवमळा परिसरात वसंता अनंथा साळुंके व दगडू अंनथा साळुंके यांच्या मालकीच्या शेतात, वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. मंगळवारी (ता.२६) पहाटेच्या सुमारास पिंजऱ्यात ठेवलेल्या भक्षाच्या आमिषाने बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या सुमारे अडीच वर्षे वयाचा मादी जातीचा असल्याचे सांगण्यात आले.

वनविभागाचे प्रभारी वनपाल डी. डी. फापाळे व वनकर्मचारी जे. टी. भंडलकर यांनी या बिबट्यास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने माणिकडोह येथील बिबट्याच्या निवारा केंद्रात हलविले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे क्षेत्र आहे. दरम्यान  कोंबरवाडी, तांबेवाडी, शिवनेरवाडी आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन बिबट्यांसह बिबट्याच्या बछड्यांचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे.  सोमवारी (ता.२५) शिवनेरवाडी येथे भास्कर बाबुराव गुंजाळ यांच्या २ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या, तर तांबेवाडी येथे भिकाजी तुकाराम तांबे यांची १ शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. तसेच परिसरात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवरील बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.

परिसरात अजूनही बिबट्याचा वावर असून वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पुन्हा पिंजरा लावावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते टी. एल. गुंजाळ यांनी केली आहे. परिसरात काहीवेळेस भरदिवसाही बिबट्या वावरताना दिसत असल्याने, शेतातील कामे करण्यासही शेतकरी वर्ग घाबरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.  दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्याची समस्या दिवसेंदिवस गंभीरपणे भेडसावू लागल्याने, वनविभागाने बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
 
Web Title: The leopard is clothed in a cage in Kombarwadi

टॅग्स