'तो' पाठलाग करता करता पडला विहिरीत अन्...

well.jpg
well.jpg
Updated on

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील पाटीलवस्तीजवळ असलेल्या एका विहीरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटना बुधवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली. वेळेवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असता तर बिबट्याचा जीव वाचविण्यात यश आले असते, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पाटीलवस्तीजवळ चासकर कुटूंबियांची सामाईक विहीर आहे. सदर विहीर २५ ते ३० फूट खोल असून पाण्याने भरलेली असून सभोवताली कठडे नाहीत. बुधवारी सकाळी संदिप चासकर हे कृषी पंप सुरु करण्यासाठी विहीरीवर गेले असता त्यांना विहीरीत बिबट्या तरंगताना दिसला. ग्रामस्थांनी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जय पाचपुते यांनी वनविभागाला माहिती दिली. कळंबचे वनपाल नारायण आरुडे, मंचरचे वनपाल एस. एन. भोसले, वनरक्षक भानुदास भालेराव, राजेंद्र गाढवे, कैलास दाभाडे, रईस मोमीन, वनमजुर कोडीभाऊ डोके, पोलिस पाटील सविता पडवळ यांच्यासह ग्रामस्थांनी बिबट्याला विहीरी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

बिबट्याने पाण्याबाहेर येण्याचे प्रयत्न केले, मात्र त्याला बाहेर पडता आले नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा. मृत बिबट्या हा नर असून ६ वर्ष वयाचा आहे. बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असताना विहीरीत पडला असण्याची शक्यता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश शिंदे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. अवसरी-पेठ घाट येथे जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अशितोष शेंडगे व वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाळुंगे पडवळ येथे गेल्या एक ते दीड महिन्यापासून दोन ते तीन बिबट्यांचा वावर आहे. सैदमळा, चासकरमळा, नवलेमळा, घोडेकरमळा यांच्यासह बहुतांश वस्तीवर बिबट्याने कालवडी, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मेंढपाळांचे घोडे आदींचा फडशा पाडला आहे. दिवसाही बिबट्याचे दर्शन होत आहे. परिसरातून एकट्याने फिरणे देखिल धोक्याचे होऊ लागले होते. या भागात बिबट्याने दहशत निर्माण केल्याने ऊस पिकांना देणेही शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.

वारंवार बिबट्याकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे पशुपालक हतबल झाले होते. वनविभागाकडे पिंजरे लावण्यासाठी मागणी करुन देखिल पिंजरे उपलब्ध करुन दिले जात नव्हते. वेळेवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असता तर बिबट्याचा जीव वाचविण्यात यश आले असते, असे हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत सैद पाटील यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com