चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा शिरकाव

चाकण औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा शिरकाव
Published on

चाकण, ता. ८ : येथील औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंझ कंपनीच्या परिसरात आज पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने तातडीने दखल घेत परिसरात पाहणी केली असून, खबरदारीचा उपाय म्हणून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे.
औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज आणि लगतच्या कंपनीत बिबट्या वावरत असल्याचे कामगार व सुरक्षा रक्षकांनी पाहिले. याची माहिती मिळताच चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. कंपनी अधिकारी व कामगारांशी चर्चा केल्यानंतर वनविभागाने परिसराची कसून तपासणी केली. प्रत्यक्ष पाहणीत बिबट्या आढळला नसला तरी, कंपन्यांच्या आवारातील दाट झाडीझुडपांमुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वनविभागाने मान्य केली आहे. यापूर्वीही बजाज ऑटो कंपनीच्या परिसरात बिबट्या आढळला होता. औद्योगिक क्षेत्रात कामगारांची मोठी संख्या असल्याने कोणालाही इजा होऊ नये, यासाठी वनविभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. सध्या वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच आम्ही पाहणी केली आहे. औद्योगिक वसाहतीत झाडांचे प्रमाण जास्त असल्याने वन्यप्राण्यांचा वावर असू शकतो. खबरदारी म्हणून आम्ही पिंजरा लावला असून कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण दखल घेतली जात आहे.
- संतोष कंक, वनपरिक्षेत्र अधिकारी, चाकण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com