शिकोजीबाबा घाटात बिबट्याचे दर्शन

शिकोजीबाबा घाटात बिबट्याचे दर्शन
Published on

पारगाव, ता. १९ : लोणी (ता. आंबेगाव) ते वाफगाव रस्त्यावरील शिकोजीबाबा घाटात मंगळवारी (ता. १८) सायंकाळी रस्त्यालगत बिबट्याचे दर्शन झाले. या परिसरात वारंवार बिबट्या दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरदाळेचे माजी उपसरपंच मयूर सरडे व आदिनाथ तांबे हे दोघे शिरदाळेवरून चारचाकी वाहनातून लोणीकडे जात असताना शिकोजीबाबा घाटात रस्त्यालगतच्या झाडीत बिबट्या बसलेला दिसला. सरडे यांनी मोबाइलमध्ये बिबट्याचे चित्रीकरण केले आहे.
दरम्यान, या अगोदर परिसरातील शेतकऱ्यांना शेतात काम करताना किंवा या घाटातून जाताना बिबट्याचे वारंवार दर्शन झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी सरडे यांनी केली आहे.

07294

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com