पिंपरखेडला ८ वर्षीय नर बिबट्या जेरबंद

पिंपरखेडला ८ वर्षीय नर बिबट्या जेरबंद
Published on

कवठे येमाई, ता. १९ : पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या आठ वर्षीय नर बिबट्याला वनविभागाने सोमवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद केले.
पिंपरखेड येथील परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाने विश्राम चव्हाण यांच्या शेतात पिंजरा लावला होता. यामध्ये भक्षाच्या शोधात आलेला बिबट्या अडकला. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला तत्काळ माहिती दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक नारायण राठोड रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद झालेल्या बिबट्याची माणिकडोह (ता. जुन्नर) येथील बिबट निवारण केंद्रात रवानगी केल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी दिली. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र अद्यापही पिंपरखेड, चांडोह, कवठे येमाई, जांबूत परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

02077

Marathi News Esakal
www.esakal.com