

आंधळगाव, ता. २० : पिंपळसूटी व आंधळगाव (ता. शिरूर) येथे वन विभागाने गुरुवारी (ता.२०) एकाच दिवशी दोन बिबटे जेरबंद केले. पिंपळसूटी येथे गेल्या १२ दिवसांत चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनविभागाने तीन दिवसांपूर्वी शेतकरी रामदास काळे यांच्या शेतात एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. त्याच शेतात गुरुवारी पहाटे पुन्हा एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे परिसरात आणखी किती बिबट्यांचा वावर आहे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पिंपळसूटी येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्याबरोबरच परिसरातील अन्य बिबटे पकडण्यासाठी वन विभागाची मोहीम सुरू आहे.
पिंपळसूटीतील शेतकरी ऋषी फराटे, राजेंद्र काळे, नवनाथ थोरात, सुरेश चव्हाण, शहाजी मोहिते, जालिंदर मोहिते आदींनी वन विभागाला सहकार्य केले.
पिंपळसूटीतील बिबट्यांची शोधमोहीम सुरू असतानाच आंधळगाव येथेही उत्तम कुसेकर यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी सकाळी एक सहा वर्षांचा बिबट्या जेरबंद झाला. आदित्य कुसेकर शेतात गेले असता त्यांना बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला ताब्यात घेतले. पिंपळसूटी व आंधळगाव येथे पकडलेले दोन्ही बिबटे माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बिबटे पकडण्यासाठी शिरूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे सुधीर शितोळे, शरीफ शेख, मनोज चौधरी, गोविंद शेलार, अमोल पाटोळे, रोहिदास शेंडगे, सुनील कळस्कर, शरद गदादे, संदीप गव्हाणे, राहुल अवचिते यांनी परिश्रम घेतले. आंधळगावातील शेतकरी शशिकांत कुसेकर, आदित्य कुसेकर, नीलेश भोसले, केशव कुसेकर, गणेश सोनवणे आदींनी वन विभागाला सहकार्य केले.
03512
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.