खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी पाणीसाठा 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

खडकवासला प्रकल्पातील टेमघर,वरसगाव,पानशेत व खडकवासला या चार धरणांच्या पाणलोटक्षेत्रातही समाधानकारक पाऊस झालेला नाही.गतवर्षी खडकवासला प्रकल्पात याच तारखेस सुमारे70टक्के म्हणजे 20.44टीएमसी पाणीसाठा होता

पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पात सध्या केवळ 33.89 टक्के म्हणजे 9.87 अब्ज घनफूट (टीएमसी) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यंदाच्या पावसाळ्यात भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस नाही. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गतवर्षी खडकवासला प्रकल्पात याच तारखेस सुमारे 70 टक्के म्हणजे 20.44 टीएमसी पाणीसाठा होता. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्केवारी) : 
 

टेमघर 0.73 (19.78) 
वरसगाव 4.11 (32.04) 
पानशेत 4.30 (40.42) 
खडकवासला 0.73 (37.15) 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less than half the water storage in Khadakwasla