सोमेश्वरनगर - जेजुरीतील गाढवांच्या बाजारात माधव गाडगीळ हे नारायण टाक यांच्यासोबत बाजारात फिरून माहिती घेत होते. एका गाढवाच्या मालकाने थेट गाडगीळांनाच, ‘आम्ही पिढ्यानपिढ्या असंच गाढवं वळत राहणार!.तुमच्यासारखं साहेब कधी होणार?’ असा सवाल केला आणि सोबतचे लोक गोंधळले. पण गाडगीळ शांत होते. ते तिथल्याच एका गाढवावर बसले! एका महान संशोधकाने छोट्या कृतीतून श्रम करणाऱ्या गाढवाला आणि त्याच्या मालकालाही प्रतिष्ठा दिली.आंतरराष्ट्रीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्ताने अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नारायण टाक यांनी अनुभवाला उजाळा दिला. तसेच गाडगीळांचे शिष्य व वटवाघूळ संशोधक डॉ. महेश गायकवाड यांनीही त्यांच्या भेटीचा अनुभव सांगितला..अर्थशास्त्रातील संशोधनाबद्दल डॉ. टाक यांच्या सत्कारासाठी गाडगीळ येणार होते. पौष पौर्णिमेचा गाढवांचा बाजार असतो हे कळाल्यावर गाडगीळ आदल्या दिवशीच २७ जानेवारी २०१३ला हजर झाले. नारायण टाक, गाढव पाळणारे रामदास जाधव, कुमार पवार, विजयकुमार हरिश्चंद्रे आदींनी गाडगीळांनी बाजार दाखवला. सौदे पाहिले.गाडगीळ यांनी गाढवांची किंमत, वय, कामे अशी सर्वंकष माहिती घेत होते. चार काठेवाडी गाढवांच्या मालकाने रामभाऊंना गाडगीळांबद्दल विचारले. रामभाऊ म्हणाले, ‘हे साहेब आहेत.’ यावर मालक आपण दुय्यम, निम्नस्तरीय असल्याच्या दुःखद भावनेने म्हणाला, ‘आमच्या बापानं हेच केलं..आम्ही पण तेच करायचं का?’ गाडगीळांनी त्याला उत्तर न देता एका गाढवाकडे बोट दाखवून म्हणाले, ‘मला याच्यावर बसायचे आहे!’ सगळे अवाक झाले. रामभाऊंनी कमी उंचीचे गाढव निवडले. गाडगीळ त्यावर बसले आणि सवाल करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू उमलले. हे छायाचित्र अनेक माध्यमांनी देशभर पोहोचविले! हा अनुभव डॉ. टाक यांनी ‘कोलाज’ पुस्तकातही लिहिला आहे..गाढविणीच्या दुधासाठी फोन आलाच नाहीगाडगीळांच्या आईच्या जन्माआधी सहा भावंडांचे निधन झाले होते. आई जन्मल्यावर ‘गाढविणीचे दूध मुलीला पाजा’ असा सल्ला कुणीतरी दिला. तो पाळला आणि आई जगली. या अनुभवामुळे गाडगीळही रामभाऊ जाधव यांच्या घरी गेले आणि गाढविणीचे ताजे दूध पिले, असा अनुभव सांगून टाक म्हणाले, २३ डिसेंबर २०२५ ला गाडगीळ सरांनी फोन करून गाढविणीचे दूध पिण्याची इच्छा व्यक्त केली.रामभाऊंनी दूध पुण्यापर्यंत टिकणार नाही असा अनुभव सांगितला. हे फोनवरून सांगितल्यावर गाडगीळ म्हणाले, ‘चितळ्यांकडून दूध प्रिझर्व्ह कसे करतात याची माहिती घेऊन सांगतो’; पण फोन आलाच नाही....शारदानगरला भेटबारामतीचे डॉ. महेश गायकवाड यांनी, जागतिक दर्जाचे पण अत्यंत जमिनीवर असणारे गाडगीळ २००७ मध्ये शारदानगर महाविद्यालयात आणि कृषी विज्ञान केंद्रात आले होते. प्रत्येक गावाचा ‘पब्लिक बायोडायव्हर्सिटी रिपोर्ट’ करायचा..गावातील जैवविविधता ही संपत्ती असून त्याच्या विद्यार्थी-शिक्षकांच्या सहाय्याने नोंदी करायच्या अशी त्यांची इच्छा होती. भावी पिढीतल्या विद्यार्थिनींशी बोलण्यासाठी ते आले होते. मी त्यांच्या अनेक कार्यशाळा अनुभवल्या. सह्याद्री वाचवण्यासोबतच असंख्य शिष्य त्यांनी तयार केलेत. सरकारी धोरणांबाबत अस्वस्थ असायचे, असे अनुभव सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.