
जुनी सांगवी : १९ सुदृढ आदर्शवत समाज निर्मितीसाठी युवकांनी महापुरुषांचे विचार आत्मसात करून रोजच्या जिवनात त्यांचे संस्कार अंगिकारले पाहिजेत. ध्येयपूर्तीसाठी लक्ष्य असणे गरजेचे आहे.त्यासाठी कष्टाची अभ्यासाची खडतर परिश्रमाची तयारी असली पाहिजे. जुनी सांगवी येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन आयोजित ' संयुक्त जयंती महोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या व्याख्यानमालेत प्रा.नीतिन बानगुडे पाटील यांनी 'चला नवीन पिढी घडवुया’ विषयावर व्याख्यानात बोलताना सांगितले.