
- सुचिता गायकवाड
पुणे - आवडीखातर परदेशातून विविध प्रजातींच्या श्वानांची खरेदी करून त्यांची आयात करण्याची ‘क्रेझ’ वाढली आहे. त्या श्वानाचा आहार, त्यासाठी ॲक्सेसरीज, फॅशन आदींसाठी श्वानप्रेमी लाखो रुपये सहजपणे खर्च करीत आहेत.
आवडीचे श्वान परदेशातून मागविण्यासाठी त्यांचे नियोजन देखील होत आहे आणि त्यानुसार त्याची खरेदी होत आहे. काही वर्षापूर्वी ‘लॅब’ या श्वानाची मागणी वाढली होती. ही जाती खेळकर आणि कुटुंबप्रिय असल्याने लहानांपासून-मोठ्यांपर्यंत यास पसंती मिळत होती. सध्या ‘गोल्डन रिट्रीव्हर’ या जातीच्या श्वानांना मागणी वाढली आहे.