स्त्रियांना माणूस म्हणून जगू द्या - रुपाली चाकणकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

‘समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय पाहताना माणूस म्हणून त्यांना जगू द्या. ‘ती’देखील एक माणूसच आहे. तिच्यासाठीच्या संवेदना जागी करण्याची आज गरज निर्माण झाली आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. रुपीनगर येथे त्यांच्या हस्ते १२५ महिला बचत गटांचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. महापौर उषा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, संजोग वाघेरे, मोहिनी लांडे, नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

रावेत - ‘समाजात स्त्रियांवर होणारे अन्याय पाहताना माणूस म्हणून त्यांना जगू द्या. ‘ती’देखील एक माणूसच आहे. तिच्यासाठीच्या संवेदना जागी करण्याची आज गरज निर्माण झाली आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. रुपीनगर येथे त्यांच्या हस्ते १२५ महिला बचत गटांचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या. महापौर उषा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, संजोग वाघेरे, मोहिनी लांडे, नगरसेवक प्रवीण भालेकर, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चाकणकर म्हणाल्या, ‘‘स्त्री ही सोशिक आहे. मात्र, तिचा अंत पाहू नका. ती एक प्रथम माणूस आहे. महिलांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बचत गटांचे व्यवसाय गटात रुपांतर झाले पाहिजे. महिला गटाने उत्पादिक केलेल्या वस्तूंवर कर नसल्याने याचा फायदा महिलांनी उद्योग सुरू करून घेतला पाहिजे.’’

नगरसेवक प्रवीण भालेकर प्रास्ताविक करताना म्हणाले, की ‘‘रुपीनगर, सहयोगनगर, ताम्हाणे वस्ती, तळवडे भागातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. महिलांना अर्थसाह्य, रोजगार व बाजारपेठ यांची सांगड घालणे तसेच स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचत गटांचे संस्थात्मक स्वरूप अधिक बळकट करण्यासाठी महिलांचे गट निर्माण केले आहेत.’’ महापौर ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी महिलांसाठी असलेल्या योजनांची बॅंकेकडून मिळणारे आर्थिक सहाय्य याबद्दल माहिती दिली. माया भालेकर यांनी स्वागत केले. नरेंद्र भालेकर यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Let women live as men rupali chakankar