लाॅकडाउननंतरचे ग्रंथालयांचे नवे स्वरूप कसे असेल ते पाहा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हे अनिवार्य झालेले असताना त्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या ग्रंथालयांध्येही बदल घडत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाईन ई साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुणे ः कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण हे अनिवार्य झालेले असताना त्या दृष्टीने महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या ग्रंथालयांध्येही बदल घडत आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांना जास्तीत जास्त ऑनलाईन ई साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच यासाठी ग्रंथपालांना प्रशिक्षण देऊनही त्यांना यासाठी सज्ज केले जात आहे. उच्च शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमासह जास्तीत जास्त पुस्तकांचा संदर्भ घेऊन त्यातून ज्ञान घेण्यासह महत्व असे. यासाठी पुस्तके, शोध निबंध, लेखमाला याचा आधार घेतला जातो.

"कोरोना'मुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये, विद्यापीठ बंद आहेत. आता नवीन वर्षात अभ्यासक्रम शिकविण्यासाठी ऑनलाईन क्‍लास हा पर्याय समोर येत आहेत. बहुतांश विद्यार्थी हे दुसऱ्या शहरात शिकत असल्याने व ते आत्ता गावाकडे असल्याने अशा स्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी ग्रंथालयात जाणे आवश्‍यक आहे. तसेच अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे त्यासाठी महाविद्यालये व विद्यापीठातील ग्रंथालयांना ऑनलाईन पोर्टलचा वापर करणे अनिवार्य झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाने लॉकडॉऊनच्या काळात यासाठी काम केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना घरातून ऑनलाईन पुस्तके, जर्नल्स उपलब्ध व्हावीत यासाठी लॉग ईनद्वारे ऍक्‍सेसही दिला होता.

ग्रंथपालांना प्रशिक्षण- आगामी काळात ग्रंथालयांचे काम ऑनलाईन चालणार असल्याने विद्यीपाठ अनुदान आयोग (यूजीसी), सावित्रीबाई फुले पुणे विद्यीपीठ आणि सेंट व्हिसेंट वाणिज्य महाविद्यालयाने दोन आठवड्यांचा फॅकल्टी डेव्हलमेंड प्रोग्राम घेतला. त्यात लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम, ई सामग्री आणि वाड्‌मय चौर्य, शैक्षणीक व्हिडीओ संपादन, इ सामग्री निर्मीतीसाठी ब्रॉडकास्टिंग सॉफ्टवेअर, योग्य संदर्भ पुस्तक उपलब्ध करून देणे यासह अन्यबाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, केरळ, पश्‍चीम बंगाल, पंजाब, छत्तीगड, गुजरात, तेलंगणा यासह अन्य राज्यातून 367 ग्रंथपालांनी सहभाग घेतला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे शिक्षण पद्धतीत बदल होत असताना त्यादृष्टीने ग्रंथालयातही बदल होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने ग्रंथपालांना प्रशिक्षण देण्यात आले. पुणे विद्यापीठाच्या जयकल ग्रंथालयातही ऑनलाईन सामग्री मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचाही लाभ विद्यार्थी, प्राध्यापकांना येत्या काळात होणार आहे.-डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता, पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय जर्नल्स, इ बुक, यासह कॅपीराईट मुक्त पुस्तके, हस्तलिखीते विद्यार्थी, प्राध्यापक यांना उपलब्ध ऑनलाईन करून दिले आहे. यामध्ये 8 हजार जर्नल्स, 9 हजार पेक्षा ई बुक्‍स याचा समावेश आहे.-नागेश लोंढे, सहाय्यक ग्रंथपाल, जयकर ग्रंथालय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Library work will be done online