
पुणे : कल्याणीनगरमधील भीषण पोर्श कार अपघातानंतर पोलिसांनी अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात तातडीची कारवाई करीत दीर्घकालीन परिणामकारक धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे.