पुणे - ‘दोन देशांमध्ये केवळ भूपृष्ठीय कारणांमुळे युद्ध होत नाही. आर्थिक कोंडी करणे, सायबर हल्ला, चुकीची माहिती पसरविणे (प्रपोगंडा), मानसिकदृष्ट्या कमकुवत करणे हीदेखील युद्धतंत्रेच आहेत. .या नव्या स्वरूपाच्या युद्धांना तोंड देण्यासाठी लष्करासह पर्यावरण, उद्योग, शिक्षण, संशोधन अशा सर्व क्षेत्रांच्या बळकटीकरणातून सर्वसमावेशक युद्धतंत्र विकसित करावे लागेल,’ असे मत लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) यांनी व्यक्त केले.खंदारे यांनी शुक्रवारी ‘सकाळ’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रत्येक नागरिकांनी आपल्या लष्करावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. लष्करी कारवाईचे पुरावे मागितल्यावर खंत वाटते,’ अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली. ‘पूर्वी आपल्याला युद्धासाठी लागणारे सर्वच शस्त्रास्त्रे ही दुसऱ्या देशांतून आयात करायला लागायची..त्यामुळे त्याची दुरुस्तीदेखील देशात व्हायची नाही. आता मात्र ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेच्या माध्यमातून आपणही शस्त्रास्त्रे खासगी उद्योगांच्या मदतीने तयार करत आहोत. अर्थात अजूनही आपल्याला काही सामग्रीसाठी अन्य देशांवर अवलंबून राहावे लागते,’ असे खंदारे यांनी सांगितले.‘ऑपरेशन सिंदूर’बाबत बोलताना ते म्हणाले, ‘आपण पाकिस्तानवर हल्ला केला; पण तो नागरी वसाहतींवर नसून दहशतवादी तळांवर होता. ‘ऑपरेशन सिंदूर’वेळी युद्ध थांबवायला नको होते, असे मत अनेकांनी व्यक्त केले..मात्र, आपला हेतू पाकिस्तानविरुद्ध युद्ध करण्याचा नव्हता; तर तेथील दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचा होता. त्यापुढील प्रत्येक कारवाई ही पाकिस्तानच्या कुरापतींना दिलेले उत्तर होते. आपला उद्देश साध्य झाल्यानंतर कारवाई थांबवण्यात आले. रशिया-युक्रेनसारखे वर्षानुवर्षे युद्ध सुरू ठेवून होणारा नरसंहार परवडणारा नाही.पाकिस्तानबरोबरचे प्रत्यक्ष युद्ध संपले असले, तरी ते अप्रत्यक्षपणे व्यापक स्वरूपात सुरूच आहे. भारताकडून मिळणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा वापर करून तो पैसा ते दहशतवादी कारवायांसाठी वापरत होते, म्हणून आपण सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या कराराबाबत २०१९ पासून आपण मंथन करत होतो.’.‘लष्करावर विश्वास हवा’‘युद्ध शस्त्राने नव्हे; तर लढाऊ वृत्तीने जिंकता येते. ही लढाऊ वृत्ती भारतीय जवानांमध्ये आहे. आपल्याकडे लष्कर व सरकार या दोन वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. इतर देशांप्रमाणे आपल्याकडे लष्कर हे कधीच राजकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करत नाही.आणीबाणीच्या काळातही त्यांनी हस्तक्षेप केला नाही. जवान आपल्या जिवाची पर्वा न करता सीमेवर लढतात. त्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’वर केले जाणारे राजकारण अयोग्य आहे. लष्करावर विश्वास हवा,’ असेही लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) म्हणाले..खंदारे म्हणाले...युद्धाचे स्वरूप बदलले असून त्यानुसार आपणही बदल करायला हवाभारतात ‘इंजिन सिटी’ विकसित करायला हवीसंशोधन व विकासावर पुरेसे लक्ष द्यायला हवे देशातील पुणे, हैदराबाद येथे आयटी सिटी आहेत; त्यांच्यासाठी ‘सायबर वॉरियर’ तयार करायला हवेतसमाज माध्यमांचा वापर देशाच्या हितासाठी व्हावा.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.