Pune : जीवनावर डिजिटल संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो

‘क्षितीज आणि किनारा’ या कादंबरीचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले
pune
punesakal

पुणे : आजच्या काळात शहरी किंवा कॉर्पोरेट कल्चरवरील मराठी भाषेत लिखाण आणि साहित्याचा अभाव आहे. परदेशातील नोकरी शिक्षण अशा विविध कारणांमुळे शहरातील नागरिकांचे नाते हे जगाशी जोडले गेलेले आहे.

त्यामुळे भाषेचा ही यावर परिणाम दिसून येतो. मराठी साहित्यात ग्रामीण भागातून स्थलांतरित होणारे किंवा शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांच्या जीवनावर आधारित लेखन बऱ्यापैकी दिसून येते. परंतु त्या तुलनेने कॉर्पोरेट जगतातील घडामोडींशी संबंधित गोष्टी आजही मराठी साहित्यापासून दूर आहेत. असे मत साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्‍यक्त केले.

दिलीपराज प्रकाशनातर्फे वैशाली फाटक-काटकर लिखित ‘क्षितीज आणि किनारा’ या कादंबरीचे प्रकाशन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी लेखक आणि माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, दिलीपराज प्रकाशनाचे मधुर बर्वे, लेखिका वैशाली फाटक-काटकर आदी उपस्थित होते.

यावेळी देशमुख म्हणाले, ‘‘कॉर्पोरेट जगतातील अनुभवविश्व हे त्या कॉर्पोरेट वर्तुळापुरतेच मर्यादित न राहता त्या अनुभवांच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे. ते अनुभवविश्व मराठी साहित्यात प्रतिबिंबित झाले पाहिजे.’’

कॉर्पोरेट कक्षेत्राचे जग हे फार वेगळं नाही. त्यातही आपल्याला समाजाची प्रतिमा दिसून येते. अलीकडे प्रत्येकाच्या जीवनावर डिजिटल संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. कॉर्पोरेट जगातील विविध पैलू हे सर्वांपर्यंत सहज पोचणे आवश्‍यक आहे.

तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील या जगाची माहिती मिळावी यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. मात्र सध्याची शिक्षण पद्धत आणि कॉर्पोरेट क्षेत्र ही रेल्वेच्या रुळांसारखी असून ते कधीच एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्याच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाऊ शकतो. असे यावेळी डॉ. शिकारपूर यांनी सांगितले.

यावेळी लेखिका वैशाली यांनी पुस्तक लेखणामागील भूमिका मांडली तर, प्रास्ताविकात मधुर बर्वे यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले व सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com