‘लाइट बीम’वर आजपासूनk बंदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

पुणे - लोहगाव विमानतळाच्या १५ किलोमीटर परिसरात सायंकाळी सहा ते सकाळी सहा दरम्यान प्रखर ‘लाइट बीम’ (प्रकाशझोत) सोडण्यास शहर पोलिसांनी पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. या लाइट बीमचा विमानांच्या वाहतुकीला अडथळा होत असल्याने हा निर्णय घेतला आहे. बुधवार (ता. १४)पासून या आदेशाची अंमलबजावणी होणार असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अटकेची कारवाई होईल, अशी माहिती सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.  

खासगी कार्यक्रम किंवा व्यावसायिक प्रदर्शनांदरम्यान असे लाइट बीम आकाशात सोडण्याची सध्या क्रेझ आहे. त्याचा विमानाच्या वाहतुकीवर परिणाम होतो, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यानुसार आता लोहगाव विमानतळापासून १५ किलोमीटर परिसरात आकाशात लाइट बीम सोडण्यास पोलिसांनी पहिल्या टप्प्यात दोन महिन्यांसाठी बंदी घातली आहे. 

लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात. तसेच खासगी विमाने आणि हेलिकॉप्टरचीही वाहतूक होत असते. वायुदलाचाही सराव सुरू असतो. अनेकदा उड्डाणादरम्यान किंवा विमान उतरविताना वैमानिकांना ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’कडून विविध आदेश दिले जातात. तसेच धावपट्टीवरही संकेतसाठी दिवे लावलेले असतात. मात्र, खासगी लाइट बीममुळे वैमानिकांचे डोळे दीपतात त्यामुळे काही वेळा त्यांची दिशा चुकू शकते. त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. 

लोहगाव विमानतळावरून 
वाहतूक होणाऱ्या विमानांची संख्या  सुमारे २१५
आंतरराष्ट्रीय उड्डाणे रोज ५
प्रवाशांची रोजची ये-जा सुमारे २२ हजार 
विमान कंपन्यांची संख्या  ११

Web Title: Light Beam ban Lohgaon Airport