Pune Light Rain
sakal
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. शनिवारी (ता. १८) सकाळपासून शहर आणि उपनगरांमध्ये अधूनमधून रिमझिम सरी कोसळत राहिल्याने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला. दिवसभर ढगांची दाटी कायम राहिल्याने उन्हाचा चटका जाणवला नाही. पुढील तीन ते चार दिवस शहरात अशाच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.