पुढील चोवीस तासात पुण्यात हलक्या सरी कोसळण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

 पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची 51 ते 75 टक्के असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याच वेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल, असेही स्पष्ट केले. 

पुणे : पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या हलक्‍या सरी पडण्याची 51 ते 75 टक्के असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याच वेळी कमाल तापमानाचा पारा 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल, असेही स्पष्ट केले. 

पुण्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, या आठवड्यात पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये शहर आणि परिसरात हलक्‍या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. 

पुण्यात शिवाजीनगर येथे 770.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे सर्वाधिक म्हणजे 909 मिलीमीटर तर, पाषाण येथे 676.2 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांमध्ये मात्र या तीनही ठिकाणी पावसाची नोंद नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: light Rainfall is expected in the next 24 hours Pune