बारामती - ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केंद्राने ज्या पध्दतीने सर्वपक्षीयांची मदत घेतली, तशीच मदत अमेरिकेने भारतावर टेरिफ वाढविल्यानंतर का घेतली नाही, अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर काही खासदार तज्ज्ञ आहेत, त्यांचा उपयोग सरकार का करुन घेत नाही, राजकारण होतच राहील पण अशा राष्ट्रीय प्रश्नावर केंद्र सरकारने सर्वपक्षीयांची मदत घ्यायला हवी, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.