माढा महावितरण उपविभागीय कार्यालयात ‘लाईनमन दिवस’ उत्साहात

माढा महावितरण उपविभागीय कार्यालयात ‘लाईनमन दिवस’ उत्साहात

Published on

UPB26B03848
माढा : येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात आयोजित लाइनमन दिवस कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा सन्मान केल्यानंतर उपस्थित मान्यवर.

लाइनमन दिनानिमित्त उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव
......
उपळाई बुद्रूक, ता. ६ : माढा उपविभागीय महावितरण कार्यालयात लाइनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच विद्युत सुरक्षिततेबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.
या कार्यक्रमास माढा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कंटे, उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव, सहायक अभियंता गावडे, विश्वेश्वर जमदाडे, अमोल आयवळे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी लाइनमनचे काम धोकादायक असले तरी अत्यंत जबाबदारीचे असल्याचे नमूद करून त्यांच्या सेवाभावाचे कौतुक केले. तसेच थकबाकी शून्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या संतोष वागज, शंकर चव्हाण, विनोद जाधव आणि रमेश जाधव यांना विशेष सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com