

Major Fire Incident in Lingali Apartment Parking
sakal
दौंड : लिंगाळी ( ता. दौंड) येथील एका अपार्टमेंट मधील १७ दुचाकी वाहने, १ कार व २ सायकली जाळण्यात आल्या आहेत. अज्ञाताने वाहने पेटविल्यानंतर अपार्टमेंटच्या मीटर बॅाक्स मधील वायरिंग जळाल्याने इमारत अंधारात आहे. दौंड - लिंगाळी रस्त्यावर बर्फ फॅक्टरीच्या पुढे उजव्या हाताला असलेल्या कल्पतरू अपार्टमेंट येथे ही आग लागली होती. मध्यरात्री एक वाजता अपार्टमेंटच्या ` बी` विंग मधील लोकांना पार्किंग मधील वाहनांना आग लागल्याचे लक्षात आले.