

Bribe
पुणे - पुण्यातील एकता सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील वाद सोडवून शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शनिवार पेठ परिसरात सापळा रचून शासनाने नेमलेल्या अवसायक (लिक्विडेटर) आणि सरकारी पॅनलवरील लेखापरीक्षक या दोघांना ३० लाखांचा हप्ता स्वीकारताना ताब्यात घेतले.