फुरसुंगी येथून चोरलेले मद्याचे बॉक्स हडपसर पोलिसांनी केले उस्मानाबादेतून जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

फुरसुंगी येथून चोरलेले मद्याचे बॉक्स हडपसर पोलिसांनी केले उस्मानाबादेतून जप्त

हडपसर : फुरसुंगी येथील मद्याच्या गोडावूनची भिंत फोडून नेलेले दारूचे बॉक्स, ट्रक, पिकअप असा सुमारे ४९ लाख रुपयांचा मुद्देमाल हडपसर पोलिसांनी उस्मानाबाद येथून जप्त केला. वाईन एन्टरप्रायझेज प्रा लि श्रीनाथ वेअर हाऊसिंगचे व्यवस्थापक संतोष लहु केशवे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर (वय २६ वर्षे रा. मु.पो. उकडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद (वय २८ वर्ष, रा. मु.पो. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर), तानाजी भागवत चौघुले (वय ३८ वर्षे, रा. मु.पो. पारडी ता. बार्शी जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

वीस दिवसांपूर्वी येथील गोडाऊनमध्ये मद्याचे बॉक्स उतरविण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीच्या रविवारच्या सुट्टीनंतर गोडाऊन उघडले असता मद्याच्या बाटल्यांनी भरलेल्या बॉक्सची चोरी झाल्याचे आढळून आले होते. चोरट्यांनी येथील सीसीटीव्हीचा डिव्हीआरही काढून नेल्याने सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले नव्हते. रॉयल स्टॅग, इंम्पेरीयल ब्ल्यु, ब्लेंन्डर या कंपन्याचे सुमारे २५ लाख ४३ हजार २०३ रूपये किंमतीचे दारूचे ३०२ बॉक्स घरफोडी चोरी करून नेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी परिसरासह पाटस टोलनाक्यापर्यंत सुमारे साडेतीनशे ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस अंमलदार सुशील लोणकर, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांच्या पथकाने उस्मानाबाद भागात तपास सुरू केला. त्यांनी आठवडाभर उस्मानाबाद भागातील कळंब, कन्हेरगाव, पांगरी, तेरखेडा, देवधानोरा, पारडी, तेरखेडा, पारधीफाटा या भागात गावांच्या परिसराची रेकी करून आरोपींबाबत माहीती मिळवली. सदरचा गुन्हा बिभीषण काळे व त्याच्या साथीदारांनी केल्याचे यातून निष्पन्न झाले.

पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुरज कुंभार, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर ही तपास पथकाची दुसरी टीम उस्मानाबाद येथे जाऊन त्यांनी आतिश ऊर्फ पिल्या विश्वनाथ बोंदर (वय २६ वर्षे रा. मु.पो. उकडगाव ता. बार्शी जि. सोलापूर), सागर ऊर्फ दाद्या शिवाजी मस्तुद (वय २८ वर्ष, रा. मु.पो. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर), तानाजी भागवत चौघुले (वय ३८ वर्षे, रा. मु.पो. पारडी ता. बार्शी जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.

Web Title: Liquor Boxes Stolen Fursungi Ecovered From Osmanabad By Hadapsar Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..