बारामतीत उघडली मद्यविक्रीची दुकाने

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 6 May 2020

- जवळपास 47 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज शहरातील मद्यविक्रीस प्रारंभ

- बारामती शहरात मद्यविक्रीची सहा दुकाने.

बारामती : जवळपास 47 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आज शहरातील मद्यविक्रीस प्रारंभ झाला. बारामती शहरात मद्यविक्रीची सहा दुकाने आहेत. आज उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांच्या बंदोबस्तात दारुविक्रीस प्रारंभ झाला. काही ठिकाणी दुकानदारांनी पहिल्या ग्राहकाचे हार घालून स्वागत केले. अनेक दुकानांबाहेर शारिरीक अंतर पाळत तसेच अत्यंत शिस्तीचे पालन करत ग्राहकांनी खरेदी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनेक दिवसानंतर दुकाने उघडल्याने विक्रेतेही खूष होते. गर्दीमुळे विचका होऊ नये, यासाठी सर्वच दुकानदारांनी दुकानाबाहेर रांग लावता येईल, असे बॅरीकेट्स लावले होते. त्यामुळे कोठेही गर्दी किंवा शारिरीक अंतराचे उल्लंघन झाले नाही. दोन ग्राहकात व्यवस्थित अंतर ठेवले जात होते. त्यामुळे कोठेही गर्दी दिसली नाही. अनेक ठिकाणी रांगा दिसल्या. पण त्यातही शिस्त होती. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

भीतीमुळेच शिस्त पाळली

अनेक दिवसानंतर दारुची दुकाने उघडल्याने तळीरामांसाठी दारु मिळणे महत्वाचे होते. त्यामुळे कोणाच्याही कोणत्याही कृतीमुळे दारु दुकानं बंद करण्याची किंवा दारु विक्री बंद करण्याची पाळी येणार नाही, याची पुरेपूर काळजी मद्यशौकींनांनी आज घेतल्याचे दिसून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquor Shops Open in Baramati

Tags
टॉपिकस
Topic Tags: