गावठी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला; ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Liquor Tempo Seized

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले.

गावठी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला; ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) लोणी काळभोर (ता. हवेली) येथे दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा (Tempo) राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी (Police) थरारक पाठलाग करून पकडले आहे. हि घटना शुक्रवारी (ता. १३ ) सकाळी घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक रामकिशन गणेशराम प्रजापती (वय- २२ रा. दत्तवाडी, उरूळी कांचन ता. हवेली, मूळ रा. रिछा गुर्जर, ता. जावरा, रतलाम मध्यप्रदेश, व राधेश्याम हरीराम प्रजापती (वय - ३२ मॉरीस बेकरीजवळ, काळेपडळ, पुणे) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. २ पुणे -सोलापूर महामार्गावर गस्त घालीत होते. गस्त घालीत असताना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील परीसरात एक संशयीतरित्या टेम्पो जात असताना आढळून आला. पोलीस दिसल्याने सदर टेम्पो चालकाने टेम्पोचा वेग वाढवला त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला व टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये ३५ लीटर क्षमतेचे २० कॅन गावठी दारूने भरलेले आढळून आले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दारू हि राधेश्याम हरीराम प्रजापती याच्या लोणीकाळभोर परीसरातील मुळा नदीकाठी, मोकळ्या जागेत असलेल्या दारू निर्मिती केंद्रावरून आणल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार सर्व [पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता २ हजार लिटर रसायन २४५ लीटर गावठी दारू, २०० किलो गुळ, अंदाजे २०० कि. ग्रॅ. भट्टीसाठी लागणारे जळाऊ सरपन, ०२ ॲल्युमिनिअम थाळ्या व चाटू, लोखंडी बॅरल, प्लॅस्टिक कॅन व गावठी दारू तयार करण्याकरीता लागणारे इतर साहित्य असा १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला तर व ४ लाख रुपयांचा एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी बी. शिंदे, दुय्यम निरीक्षक आर. डी. भोसले, पी. एस. धाईजे, यांच्यासह जवान एन. जे. पडवळ, एस. बी. मांडेकर. ए. आर. सिसोलेकर, बी. आर. सावंत, के. आर. पावडे व महिला जवान सी. एम. एम. भोसले यांनी केली आहे.

Web Title: Liquor Transporter Caught Tempo Property Worth Rupees 5 Lakh Seized Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeliquorTransportTempo
go to top