

WDR26A00391
वागदरी ः स्नेहसंमेलनात बालशिवाजी रायरेश्वर मंदिरात शपथ घेतानाचा प्रसंग सादर करण्यात आला.
लिटल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
वागदरी, ता. १७ ः येथील येथील लिटल फ्लावर कॉन्व्हेंट अभिमित विद्यालय महादेवी भांजे प्रशालाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साही वातावरणात झाले. ग्रामदैवत परमेश्वर व सरस्वती प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनिषाताई भांजे तसेच राजकुमार पोमाजी व राहुल शुक्ला यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पहिली ते चौथी व नर्सरीतील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, विठू माऊली, शिवबा राजे, शेतकरी गीत, कोळीगीत भांगडा, मराठी लावणी, भक्तिगीत, शिवाजी महाराजांचे पराक्रम दाखवणारे पोवाडा, हास्य जत्रा सादर करत नृत्य गायन व नाटक सादर करत तब्बल तीन तास प्रेक्षकाचे मनोरंजन केले. कार्यक्रमास वागदरीसह परिसरातील गोगाव, खैराट, भुरी कवठे, किरनळी, बोरगाव, घोळसगाव शिरवळवाडी येथील पालक वर्ग उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.