

लिव्हर ट्रान्सप्लांट टाळण्यासाठी वेळेत उपचार महत्त्वाचे
डॉ. राव; लवकर निदान झाल्यास फायब्रोसिसमध्येही सुधारणा शक्य
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २ : यकृताच्या आजाराची लक्षणे दिसण्याची वाट न पाहता वेळेत निदान आणि योग्य उपचार करणे महत्त्वाचे आहे. यकृताला नुकसान करणारे मूळ कारण नियंत्रणात आणल्यास काही रुग्णांमध्ये फायब्रोसिस कमी होऊन यकृताचे कार्य व रचनेत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आजार गंभीर सिरोसिसपर्यंत पोहोचू नये व लिव्हर ट्रान्सप्लांटची वेळ येऊ नये, यासाठी वेळेत उपचार आवश्यक आहेत, अशी माहिती गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी व हेपॅटोलॉजी विभागाचे क्लिनिकल डायरेक्टर व वरिष्ठ सल्लागार डॉ. के. एस. सोमशेखर राव यांनी दिली.
दीर्घकाळ हेपाटायटिस बी, सी, अतिमद्यपान, मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड स्टियाटोटिक लिव्हर डिसीज व ऑटोइम्यून यकृताच्या आजारांमुळे यकृताला वारंवार इजा झाल्यास फायब्रोसिस वाढतो. त्यातून सिरोसिस होऊ शकतो. मात्र, मूळ कारणावर नियंत्रण मिळवल्यास काही रुग्णांमध्ये फायब्रोसिसमध्ये सुधारणा शक्य असल्याचे डॉ. राव यांनी सांगितले.
हेपाटायटिस बी व सीवरील अँटीव्हायरल उपचार, मद्यपान पूर्णपणे बंद करणे, वजन कमी करणे आणि मेटाबॉलिक समस्या नियंत्रणात ठेवणे यामुळे यकृतावरील नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते. ऑटोइम्यून व कोलेस्टॅटिक आजारांवरही योग्य उपचार आवश्यक आहेत.
यकृतातील फायब्रोसिसचे मूल्यांकन करण्यासाठी फायब्रोस्कॅन ही नॉन-इन्व्हेसिव्ह तपासणी उपयुक्त ठरते. मात्र, त्याचा अहवाल रक्त तपासण्या व इतर वैद्यकीय निष्कर्षांसोबत डॉक्टरांनी तपासणे आवश्यक आहे. गंभीर किंवा डिकॉम्पेन्सेटेड सिरोसिसमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटेशनची आवश्यकता भासू शकते. यावेळी अतुल चव्हाण, साई कुमार आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.