Pune News : ‘त्या’ कारवाईनं मुलींचं जगणं अंधारात; देहविक्रयच्या संशयावरून पाठविले स्वाधारगृहात

देहविक्रीच्या नरक यातनांमधून काहीसे दूर जात त्यांनी आपल्या लेकरांना सन्मानाने उभे करण्यासाठी धडपड सुरू केली.
woman Prostitution

woman Prostitution

sakal

Updated on

पुणे - देहविक्रीच्या नरक यातनांमधून काहीसे दूर जात त्यांनी आपल्या लेकरांना सन्मानाने उभे करण्यासाठी धडपड सुरू केली. आपल्या अंधाऱ्या आयुष्यासाठी त्या मुलींमध्येच आशेचा किरण पाहत होत्या.

कोणी आईच्या पंखाखाली, तर कोणी बहिणीच्या मायेखाली विसावत शिक्षणाची एक एक पायरी ओलांडत होती. पण एका रात्रीत अचानक पोलिसांचा छापा पडतो आणि क्षणार्धात आईने-बहिणीने पाहिलेली स्वप्ने अन्‌ त्या मुलींची धडपड अक्षरशः बेचिराख होऊन जाते. त्या चार मुलींना थेट स्वाधारगृहाचा रस्ता दाखविला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com