35 हजार शेतकरी कर्ज माफी पासून वंचित

35 हजार शेतकरी कर्ज माफी पासून वंचित
Published on: 

कर्जमाफीपासून ३५ हजार
९९० शेतकरी वंचित

चार याद्यांत एक लाख एक हजार शेतकऱ्यांचा समावेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती ः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३५ हजार ९९० शेतकरी अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत चार याद्यांमध्ये एक लाख एक हजार २०९ शेतकऱ्यांचा समावेश झाला असून, प्रत्यक्षात ६५ हजार २१९ शेतकऱ्यांच्या खात्यांतच कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.
राज्य सरकारने दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ५१ शेतकऱ्यांची कर्जखाती अपलोड करण्यात आली आहेत. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ हजार ९४९, तर राष्ट्रीयीकृत बँकांच्या ९४ हजार १०२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी ८२ हजार ७२३ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी ६५ हजार २१९ शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. ई-केवायसी अपूर्ण असणे, ॲग्रीस्टॅक नोंदणी नसणे आणि कर्जदार शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला असणे, अशा कारणांमुळे अनेक शेतकरी लाभापासून दूर आहेत. जिल्ह्यात १८ हजार ५६३ शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे. तसेच अपलोड केलेल्या कर्जखात्यांमध्ये ५,०९१ मयत शेतकरी, तर ५,५६३ शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी नसल्याचे समोर आले आहे. मयत शेतकऱ्यांच्या वारसांना लाभासाठी पात्र ठरविणे, आधारद्वारे ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या २५ हजार ९२८ शेतकऱ्यांना नव्याने २६०.८४ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. कर्जमाफीपोटी आतापर्यंत ५२३.९१ कोटी रुपये जमा झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com