

कर्जमाफीची
दुसरी यादी जाहीर
यादीत ३.५५ लाख शेतकऱ्यांचा समावेश
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : शेतकरी कर्जमाफीची दुसरी ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाने शुक्रवारी (ता. ११) प्रसिद्ध केली आहे. बँकांच्या चुकांमुळे तब्बल १३ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये त्रुटी होत्या. त्यापैकी दुरुस्त केलेल्या खात्यांची यादी जाहीर करण्यात आली.
शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.
सहकार विभागाने केद्रीय प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी केल्यानंतर ३२ लाखांवर शेतकरी पात्र ठरले होते. त्यापैकी १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यापैकी १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले होते. त्यांच्या खात्यावर १०,११४ कोटी ९० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक १ लाख ९५ हजार ८९९, अमरावती विभागातील ७१ हजार ७९६ शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर सर्वात कमी कोकण विभागातील ४ हजार ८११ शेतकरी पात्र ठरले आहेत.
बॅंकांमुळे कर्जमाफी रखडणार
प्राप्तिकर विभागाकडून पडताळणी करून आलेल्या कर्जखात्यापैकी १३ लाख कर्जखात्यांमध्ये सहकार विभागाने त्रुटी काढल्या आहेत. या त्रुटींची पूर्तता करण्याचे निर्देश बँकांना दिले होते. यामध्ये बहुतांश बँका राष्ट्रीयीकृत आहेत. या बँकांनी त्रुटी पूर्ततेला वेळ लावल्याने कर्जमाफी रखडणार आहे. अद्याप १० लाखांपर्यंतच्या खात्यांची त्रुटी पूर्तता झालेली नाही.
विभागनिहाय पात्र लाभार्थी
छत्रपती संभाजीनगर विभाग – १ लाख ९५ हजार ८९९
अमरावती विभाग – ७१ हजार ७९६
नागपूर विभाग – ३४ हजार ५२०
नाशिक विभाग – २५ हजार ४७१
पुणे विभाग – २३ हजार ११७
कोकण विभाग – ४ हजार ८११
कोट ---
या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
- बाबासाहेब पाटील, सहकारमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.