बनावट भाडेकरार प्रकरणी घरमालकावर गुन्हा

बनावट भाडेकरार प्रकरणी घरमालकावर गुन्हा
Published on: 

लोणी काळभोर, ता. २९ : चारित्र्य पडताळणीसाठी पोलिस ठाण्यात बनावट ऑनलाइन भाडेकरारनामा सादर करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एका घरमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस हवालदाराच्या सतर्कतेमुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १५) उमेश श्रीहरी केदार ही व्यक्ती लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या चारित्र्य पडताळणी विभागात कागदपत्रांसह आली होती. तेथे कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस हवालदार वैशाली नागवडे यांनी कागदपत्रांची पाहणी करताना उमेशकडे राहत्या पत्त्याबाबत चौकशी केली असता, त्याला समाधानकारक माहिती देता आली नाही. संशय आल्याने नागवडे यांनी घरमालकाचा मोबाईल नंबर मागितला. तेव्हा उमेशने घरमालकाचे नाव चेतन पवार असून आपण त्याच्याच भेकराईनगर (पुणे) येथील फ्लॅटमध्ये राहत असल्याचे व त्यानेच हा फॉर्म भरून दिल्याचे सांगितले. तपासात असे निष्पन्न झाले की, घरमालक चेतन पवार (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) याने स्वतःच्या मोबाईलवरून ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून हा खोटा भाडेकरारनामा तयार केला होता. शासनाची व पोलिसांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने हा बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी चेतन पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी पुढील तपास करत आहेत. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त जीवन बेनिवाल, सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रदीप पवार, नंदकुमार कोळी, सतीश गोडसे, वैशाली नागवडे व पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com