लोणी काळभोर : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदन चोरी करणाऱ्या ७ अट्टल गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलीसांनी मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे..वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी रमेश बाबु करडे (वय ५२, रा. केडगांव, ता. दौंड, जि. पुणे), शाम तानाजी साळुंके, वय २९) संतोष आण्णा शिवरकर, वय ३०, दोघे रा. केडगांव बोरी पार्धी, ता. दौंड, जि. पुणे), विशाल अनिल दामोदरे, वय २६, रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे), फिरोज कचरु सय्यद (वय २९, रा. कासुर्डी, ता. दौंड, जि. पुणे) व पिंन्दु ऊर्फ लक्ष्मण भिमा गायकवाड (वय ३०, रा.मु. पो. निमोना, ता. शिरुर, जि.पुणे) यांना अटक करण्यात आली असुन अमोल जाधव (रा. वाळवणे, ता. पारनेर, जि. पुणे) हा अद्याप फरार आहे..दिनांक २८ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारांस पुनावाला स्टड फार्म, थेऊर, ता. हवेली येथे अनोळखी ७ चोरटयांनी सुरक्षारक्षक कुंदन शर्मा, सरजित सिंग व इंद्रजीत गुप्ता यांना धारधार शस्त्राचा धाक दाखवुन, जिवे ठार मारण्याची धमकी देऊन रक्कम रुपये ८० हजार रुपये किंमतीची ४ चंदनाची झाडे तोडुन त्यांचे ओंडके जबरदस्तीने चोरी करुन घेऊन गेलेले आहेत बाबत दिलेले तक्रारी वरुन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होता..सदर गुन्ह्याचे तपासात यातील मुख्य टोळीप्रमुख रमेश करडे याने यातील इतर आरोपींसह गुन्हेगारी टोळी करुन वारंवार गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस आयुक्त साो पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी नमुद आरोपींविरुध्द सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अन्वये कलमांचा अंतर्भाव करणेबाबत अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर केला होता..दिनांक २१ मे रोजी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर यांनी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अन्वये कलमांचा अतर्भाव करण्यास मान्यता दिल्याने सदर गुन्ह्यात मोका कलमांचा अंतर्भाव करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग, पुणे शहर यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे..सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, तत्कालीन-पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०६ डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ (अतिरीक्त कार्यभार परिमंडळ ६) सागर कवडे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पन्हाळे, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस हवालदार आण्णा माने, सागर जगदाळे, निलेश कोल्हे, वैजिनाथ शेलार, विलास शिंदे, सुरज कुंभार पोलीस अंमलदार सचिन सोनवणे, प्रविण दडस, अशोक गिरी, नितेश पुंडे, गणेश खरात, प्रशांत नरसाळे यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.