
पुणे : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक जुलैपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील सुमारे ९० लाख ३३ हजार १०४ मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत.