ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत; शरद जामदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

local-body-elections-should-not-held-without-obc-political-reservation-bjp-sharad-jamdar-indapur

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत; शरद जामदार

इंदापूर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ऍड. शरद जामदार यांनी केली. शरद जामदार पुढे म्हणाले, राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने इंदापूर तालुक्यामध्ये भिगवण व इंदापूर येथे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी दोन आंदोलन करून आवाज उठविला होता. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे.

येणाऱ्या काळात दोन तृतियांश निवडणुका होणार असून या निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही. आरक्षण नसेल तर ओबीसींना न्याय तसेच प्रतिनिधीत्व मिळणार नाही. त्यामुळे त्यांची मुख्य विकास प्रवाहात येण्याची संधी हुकणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवले होते मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना न्यायालयात हे आरक्षण टिकविता आले नाही. महाविकास आघाडी सरकारने इम्पीरियल डाटा साठी योग्य पावले न उचलता त्यांची त्यांनी दिशाभूल केली आहे.मात्र भारतीय जनता पक्ष ओबीसी राजकीय आरक्षणाच्या पाठीशी ठाम आहे. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शकील सय्यद उपस्थित होते.

Web Title: Local Body Elections Should Not Held Without Obc Political Reservation Bjp Sharad Jamdar Indapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top