

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! जुन्नर-आंबेगाव परिसरातून दुचाकी चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; ४ मोटारसायकल आणि मोबाईल जप्त
Sakal
घोडेगाव : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मोटारसायकल चोरणारा राहुल अशोक दाते (रा.मंचर ता आंबेगाव) या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा व घोडेगाव पोलीस ठाणेचे पथकाने सापळा रचून अटक केले. त्यांच्याकडून 4 मोटार सायकल व 1 मोबाईल जप्त करून 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.