माढयाचे गटविकास अधिकारी बनले शिक्षक ;गटविकास अधिकाऱ्यांची शिक्षकाची भूमिका : ग्रामीण शिक्षणाला नवा उत्साह
MDH26B05145
धानोरे (ता. माढा) : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बेरीज, वजाबाकीचे धडे देताना गटविकास अधिकारी महेश सुळे.
माढ्याचे गटविकास अधिकारी बनले शिक्षक
धानोरे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना दिले गणिताचे धडे
........
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २१ : कुर्डुवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी धानोरे (ता. माढा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना गणित, भाषा विषयाच्या बेरीज, वजाबाकी, बाराखडी, वाचन यांसारख्या गोष्टी शिकवल्या. गटविकास अधिकारीच शिक्षकांच्या भूमिकेत पाहिल्याने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात व धानोरे गावातील ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
महेश सुळे यांची ही कृती केवळ औपचारिकता नव्हती तर ती शिक्षणाच्या मूळ गाभ्याशी जोडलेली होती. प्रशासनातील अधिकारी थेट विद्यार्थ्यांसमोर उभे राहून गणितातील बेरीज-वजाबाकी, भाषेतील बाराखडी आणि वाचन यांसारख्या मूलभूत गोष्टी शिकवतात, ही घटना ग्रामीण शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी ठरते. धानोरेसारख्या छोट्या गावात चौथीपर्यंतची शाळा असूनही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटविकास अधिकारी स्वतः शिक्षकाची भूमिका निभावतात, हे प्रशासनातील संवेदनशीलतेचे उदाहरण आहे. शिक्षण हा केवळ शिक्षकांचा किंवा शाळेचा विषय नाही, तर तो संपूर्ण समाजाचा आणि प्रशासनाचा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे, याची जाणीव या उपक्रमातून होते.
यावेळी अनिल देशमुख, तानाजी देशमुख, मधुकर पाटील, राजकुमार क्षिरसागर, अनिल क्षिरसागर, उज्वला क्षिरसागर, शिवाजी देशमुख, ग्रामविकास अधिकारी संजय क्षिरसागर ग्रामपंचायत अधिकारी, संजय राऊत, संतोष माळी, युवराज पवार, दाऊद सय्यद, बापूराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

