लॉकडाउमुळे आर्थिक ताणाताण वाढल्याने शेतकरी वळला पीककर्जाकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Loan

लॉकडाउमुळे आर्थिक ताणाताण वाढल्याने शेतकरी वळला पीककर्जाकडे

पुणे - जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांसाठी (Agriculture) गेल्या ५२ दिवसांत १ हजार १३२ कोटी ६० लाख ८४ हजार रुपयांचे विक्रमी पीककर्ज (Loan) वाटप झाले आहे. हे प्रमाण खरिपातील कर्जवाटपाच्या उद्दिष्टाच्या ६५.०९ टक्के एवढे झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३६९ कोटी ८५ लाख ४३ हजार रुपयांचे जास्तीचे कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. लॉकडाउमुळे (Lockdown) आर्थिक ताणाताण वाढल्याने शेतकरी (Farmer) पीककर्जाकडे वळला असावा, असा अंदाज बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला आहे. (Lockdown Farmer Agriculture Loan Pune District)

Loan

Loan

जिल्ह्यात गेल्यावर्षी कर्ज वाटपाच्या पहिल्या दीड महिन्यात ७६२ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपयांचे कर्ज वाटप पूर्ण झाले होते. कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टाच्या ४६.१३ टक्के पूर्ण झाले होते. यंदा कोरोनामुळे कर्जवाटपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती. परंतु, या उलट घडले आहे.

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी खरीप पीककर्जाच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. कर्जाची मागणी केलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्जाचा लाभ घेणारे शेतकरी, क्षेत्र आणि वाटप रकमेत वाढ झाली आहे.

- रमेश थोरात, अध्यक्ष, जिल्हा सहकारी बँक

loading image
go to top