#Lockdown2.0 : अरे देवा! लॉकडाउनची आवश्‍यकता आहे; परंतु... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

सलग सहा आठवड्यांच्या लॉकडाउनमुळे कोरोनाचा प्रसार नियंत्रित पद्धतीने होत आहे. असे असतानाही राज्यात बाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. राज्याची आर्थिक आणि सामाजिक स्थिती बघता दीर्घकालीन लॉकडाउनसाठी पर्यायी उपाययोजना आपल्याला अभ्यासाव्या लागतील.
- प्रा. मिलिंद तांबे, संगणकशास्त्र विभाग, हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका

#Lockdown2.0 : अरे देवा! लॉकडाउनची आवश्‍यकता आहे; परंतु...

पुणे - देशातील लॉकडाउनसंदर्भात रविवारी (ता. ३) निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा संसर्ग बघता अजूनही लॉकडाउनची आवश्‍यकता आहे; परंतु राज्याची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता लॉकडाउनमध्ये काही बदल होणे अपेक्षित आहे. याचाच विचार करत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठ आणि एमआयटीच्या संशोधकांनी लॉकडाउनसाठी पर्यायी सुवर्णमध्य शोधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यामध्ये सलग लॉकडाउन न करता, दर दुसऱ्या आठवड्याने लॉकडाउनचा प्रयोग करावा, असा निष्कर्ष यात मांडण्यात आला आहे. यामुळे निदान एक आठवडा आवश्‍यक कामांसाठी नागरिकांसह प्रशासनाला हालचाल करता येईल. लॉकडाउन नसलेल्या कालावधीत नागरिकांनी शारीरिक अंतराचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. अशा स्थितीतही नियंत्रित पद्धतीने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल, अशी माहिती हार्वर्डमधील संशोधक आदित्य माटे यांनी दिली. संशोधनामध्ये प्रा. एम. मुजुमदार, प्रा. मिलिंद तांबे आदींचा सहभाग आहे.   

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

मुजुमदार म्हणाले, ‘‘पुढील काही दिवसांसाठी योग्य पॉलिसी निवडणे केंद्र आणि राज्यासाठीही मोठे आवाहन असणार आहे. सामाजिक आणि आर्थिक गोष्टींवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा विचार आमच्या संशोधनात करण्यात आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे वय, राहण्याची पद्धत, ठिकाण आदी माहितीच्या आधारे हे सिम्युलेशन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती कोरोनाचा प्रसार करतो, असे गृहीत धरून एजंट बेस्ड मॉडेलचा आधार घेण्यात आला आहे.’’ महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश राज्यासाठी संशोधकांनी हे मॉडेल विकसित केले आहे.

संशोधनाची पार्श्‍वभूमी

 • २४ मार्चपासून लॉकडाउन असूनही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे
 • आर्थिक आणि सामाजिक पैलूंचा विचार करता ३ मे नंतर सलग लॉकडाउन शक्‍य नाही
 • कोरोनाबाधितांच्या मृत्यूची आकडेवारी आणि बाधितांची संख्या यांचे विश्‍लेषण आवश्‍यक
 • औषध येईपर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य पद्धतीची आवश्‍यकता

असे झाले संशोधन

 • पहिल्या तीन आठवड्यातील लॉकडाउनमधील कोरोना प्रसाराची आकडेवारीचे संकलन
 • बाधितांच्या कुटुंबातील सदस्य संख्या, राहण्याची पद्धत, पर्यावरणीय घटक यांचे विश्‍लेषण करण्यात आले
 • उपलब्ध माहितीचे एजंट बेस्ड एसईआयआर मॉडेलच्या आधारे संगणकीय सिम्युलेशन करण्यात आले
 • सलग आणि दर दुसऱ्या दिवसाला लॉकडाउन या दोन पर्यायांची चाचपणी करण्यात आली
 • ७ जूनपर्यंत होणाऱ्या परिणामांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला

संशोधनाचे निष्कर्ष

 • दर दुसऱ्या आठवड्याला लॉकडाउन पाळल्यास बाधितांची संख्या नियंत्रित पद्धतीने वाढेल
 • लॉकडाउन नसताना शारीरिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) आणि इतर नियमांचे काटेकोर पालन आवश्‍यक
 • हे केवळ संगणकाच्या आधारे केलेले हे संख्याशास्त्रीय विश्‍लेषण आहे.

पद्धतीचे फायदे

 • प्रशासनाला आणि नागरिकांना आवश्‍यक कामांसाठी वेळ मिळेल
 • औद्योगिक आणि व्यावसायिक कामांचे चक्र सुरू होईल
 • दीर्घकालीन उपाययोजनांसाठी हालचाली करणे शक्‍य होईल
 • कृषी, लघु आणि मध्यम उद्योगांना आवश्‍यक उपाययोजना करता येतील
 • पावसाळ्याच्या दृष्टीने आवश्‍यक कृषी, उद्योग आणि प्रशासकीय कामांना वेग मिळेल

Web Title: Lockdown Required Coronavirus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top