Pune-Lockdown
Pune-Lockdown

Breaking : लॉकडाऊनबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी केली मोठी घोषणा; वाचा सविस्तर बातमी!

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनची आणखी कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, हवेली तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एखाद्या गावात पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी (ता.६) वेब पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्हाधिकारी राम म्हणाले, कोरोना बाधित रुग्ण वाढत असून परिस्थिती नियंत्रणात न आल्यास कठोर भूमिका घेण्याबाबत प्रशासन तयारी करीत आहे. लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना घरीच विलगीकरण करून राहावे. परंतु घरी स्वतंत्र विलगीकरणात राहण्याची व्यवस्था नसल्यास त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल. हवेली तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असून, त्याबाबत प्रशासनाकडून अधिक लक्ष देण्यात येईल.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आणखी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी मास्क परिधान करणे बंधनकारक असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल. 

शहरात महिनाखेर 20 हजार नवीन रुग्ण वाढणार : 
जुलै महिना अखेरपर्यंत शहरात आणखी 20 हजार नवीन बाधित रुग्णांची संख्या वाढणार असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरी गरीब रूग्ण योजनेअंतर्गत प्रति कुटुंब एक लाखापर्यंत मदत करण्यात येते. परंतु आता एकाच कुटुंबातील तीन-चार व्यक्ती बाधित होत आहेत. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकी एक लाखापर्यंत मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. 

पुणे महापालिकेतील 142 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. त्यापैकी 70 हून अधिक कर्मचारी यापूर्वीच बरे झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.

पुण्यातील खासगी रुग्णांलयांची मनमानी; ज्येष्ठ नागरिकाला गमवावा लागला जीव!​

सीओईपी आणि कृषी महाविद्यालयात नवीन कोविड केअर सेंटर
शहरातील सीओईपी आणि कृषी महाविद्यालयात नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणी मिळून 1 हजार 400 रुग्णांना राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बालेवाडी येथे कोविड केअर सेंटरची तयारी पूर्ण झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विनाकारण फिरणार्‍यांवर पोलिस कारवाई :
कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शहरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी सुमारे दीड हजार जणांवर कारवाई केली आहे. वाहन जप्त केल्यास किमान दीड हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त के.‌ वेंकटेशम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com