
धायरी : वडगाव येथील अभिरुची मॉल शेजारील भिडे उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विश्रांती आणि व्यायामाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. रोज शेकडो नागरिक येथे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. मात्र, उद्यानामध्ये असलेल्या स्वच्छतागृहाच्या असुविधेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.