लोहगाव विमानतळावर सुरक्षाव्यवस्था दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

 मंगळूरच्या विमानतळावर तिकीट काउंटरजवळ स्फोटकांची बॅग सापडल्यामुळे लोहगाव विमानतळावरही सोमवारी दुपारपासून सुरक्षाव्यवस्था दुप्पट करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवरही विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - मंगळूरच्या विमानतळावर तिकीट काउंटरजवळ स्फोटकांची बॅग सापडल्यामुळे लोहगाव विमानतळावरही सोमवारी दुपारपासून सुरक्षाव्यवस्था दुप्पट करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवरही विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशातील विमानतळांची जबाबदारी असणाऱ्या केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलातील (सीआयएसएफ) दिल्लीतील अधिकारी ‘सकाळ टाइम्स’शी बोलताना म्हणाले, ‘‘मंगळूरच्या घटनेनंतर सर्वंच विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेत आम्ही वाढ केली आहे. प्रवासी, कर्मचाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे; तसेच विमानतळाच्या प्रवेशद्वारांवर, पार्किंगमध्येही लक्ष ठेवले आहे.’’ 

खबरदारीचा उपाय म्हणून शीघ्र कृती दल, बाँबशोधक व नाशक पथक; तसेच श्‍वान पथक तैनात केल्याचे त्यांनी सांगितले.  

याबाबत विमानतळाचे संचालक अजय कुमार म्हणाले, ‘‘प्रजासत्ताक दिनामुळे विमान कंपन्यांना सुरक्षिततेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. उड्डाणापूर्वी दोन तास अगोदर प्रवाशांनी उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांना दिल्या आहेत. विमानतळाजवळही सतर्कतेचा इशारा दिला आहे.’’
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lohagaon airport doubles security