लोहगावात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

लोहगावात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

Published on

लोहगाव, ता. ४ : परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने बुधवारी (ता.४) मोठी कारवाई केली. यात लोहगाव-वाघोली रस्त्यालगत तसेच डायमंड वॉटर पार्क रस्त्यावर उभारलेली अनियमित निवासी आणि व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली. रस्त्यालगत असलेल्या दुकानांसमोरील अनधिकृत पत्राशेड तसेच नियमबाह्य पद्धतीने बांधलेल्या काही निवासी इमारतींवर हातोडा चालवण्यात आला.
कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. ज्युपिटर सिटी येथील एका हॉटेलमधील नागरिकांना आधी सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हॉटेलवरील अनधिकृत बांधकामाचा भाग पाडण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कारवाई पार पाडली. या मोहिमेत १५ जेसीबी, ब्रेकर मशिन्स, कटर, अतिक्रमण विभागाची वाहने, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. कारवाईत सुमारे अठ्ठ्याहत्तर हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. ज्यात आर.सी.सी बांधकाम व पत्राशेडचा समावेश आहे. जवळपास अठरा अनधिकृत बांधकामांना यापूर्वी नोटीस देण्यात आली होती. मात्र, जागामालकांनी स्वतःहून अतिक्रमण न काढल्यामुळे आज कारवाई केली असल्याची माहिती महापालिकेचे बांधकाम विभागातील अभियंता इरफान शेख यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com