खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय

खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय
Published on

लोहगाव, ता. १८ : येथील वडगाव शिंदे रस्त्यावरील राखपसरे वस्ती परिसरात जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवसांपूर्वी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र, जलवाहिनीचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटूनही रस्ता पूर्ववत केलेला नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र, सध्या येथे केलेल्या खोदाईमुळे परिसरात धुळीचे लोट उडत आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवासी, दुकानदार आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अवजड वाहनांची सततची ये-जा आणि खड्डेमय रस्ता यामुळे विशेषतः दुचाकीस्वारांना अडचणी येतात. अनेक ठिकाणी सैल मुरूम व खडी पसरलेली असल्याने वाहन घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात दर रविवारी आठवडे बाजार भरतो. याठिकाणी हजारो लोक खरेदीसाठी येत असतात. अशात ग्राहकांची गर्दी आणि खराब रस्त्यामुळे येथील वाहतूक मंदावून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

जलवाहिनीच्या चाचणीमुळे रस्ता दुरुस्तीचे काम रखडले होते. चाचणी यशस्वी झाली असून, येत्या आठ दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल.
- शुभम घाटकर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग

वडगाव शिंदेकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे येथे वर्दळ जास्त असते. रस्ता खोदलेला असल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- वैभव शिंदे, नागरिक

लोहगाव : राखपसरे वस्ती परिसरात जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेला रस्ता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com