लोहगावातील रुंदीकरण अद्याप रखडलेलेच
लोहगाव, ता. ३ : लोहगाव-वाघोली मुख्य रस्त्यावरील गोठणओढा रस्ता चौक ते योगीन बेलवा सोसायटीदरम्यान सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवघ्या काही मीटरचे हे रुंदीकरणाचे काम वर्ष उलटूनही पूर्ण न झाल्याने परिसरात वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे.
लोहगाव-वाघोली हा परिसरातील प्रमुख आणि अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा होते. शालेय बस, पीएमपी बस व खासगी वाहनांसह अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी परतीच्या गर्दीत कोंडी तीव्र होते. अशात या रस्त्याची एक बाजू खोदलेली असल्याने वाहनचालकांना कसरत करत प्रवास करावा लागतो.
या रस्त्याची कड खोदलेली अशातच त्यातील खडी, मुरूम वर आल्याने पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. धुळीचे प्रमाण वाढल्याने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. याचबरोबर कोंडीच्या वेळेत येथील व्यवसायांवरही परिणाम होत असल्याने व्यावसायिकांना फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
भूमिगत केबल आणि झाडांच्या अडथळ्यामुळे रुंदीकरणाच्या कामास विलंब झाला आहे. सध्या काम प्रगतिपथावर असून लवकरच संपूर्ण रस्ता नागरिकांच्या वापरात येईल.
- पौर्णिमा गायकवाड, अभियंता, पथ विभाग
सायंकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्यास पायी रस्ता ओलांडणेही कठीण होऊन जाते. अवजड वाहतुकीमुळे जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते.
- वैशाली येवले, नोकरदार महिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

