
उरुळी कांचन : चोरीला गेलेल्या वाहनांचा तसेच अज्ञात चोराचा शोध घेत असताना लोणी काळभोर पोलिसांना तब्बल १ लाख ४० हजार किंमतीची चोरी गेलेली वाहने शोधण्यात मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात सागर प्रकाश जाधव (रा. शोभा मेमाणे यांच्या घरात भाड्याने आई माता मंदिराजवळ, कवडी माळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे.