मेढा न्यायालय लोकअदालत
मेढ्यातील लोकअदालतीत ७६ प्रकरणांचा निपटारा
कुसुंबी, ता. १६ : मेढा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीत न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ७६ दिवाणी व फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे तसेच दखलपूर्व प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा करून एकूण २४ लाख ४१ हजार ६५९ रुपयांची वसुली झाली.
प्रारंभी लोकन्यायालयाचे उद्घाटन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी आर. एस. जगताप यांच्या हस्ते झाले. त्या वेळी जावळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र पोफळे, सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीनिवास कणसे, ॲड. अनुप लकडे, ॲड. आरती शेटे, ॲड. आरती पवार, ॲड. विशाल महाडिक, ॲड. सरडे, ॲड. पूनम गोरे, ज्येष्ठ विधिज्ञ माने, तसेच महाराष्ट्र बँक, बडोदा बँक, एसबीआय बँकेचे शाखा व्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या लोकन्यायालयाच्या पॅनेलवर डॉ. विक्रम आव्हाड व ॲड. अनुप लकडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी दिवाणी, फौजदारी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८, कौटुंबिक प्रकरण, दिवाणी प्रकरणे, बँकिंगविषयी वसुलीच्या केसेस, दखलपूर्व प्रकरने ग्रामपंचायत विभाग आदी प्रकारच्या केसेस लोकन्यायालयात ठेवण्यात आलेल्या होत्या. लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी जावळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष व सदस्य तसेच सहाय्यक सरकारी वकील, विधी स्वयंसेवक पंकज मगदूम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
01431
मेढा : लोक अदालतीचे उद्घाटन करताना आर. एस. जगताप व डॉ. विक्रम आव्हाड आदी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

