Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात महायुतीची साखरपेरणी? थोपटेंच्या कारखान्याला ८० कोटींचे कर्ज मिळणार

Lok Sabha Election 2024: महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील तेरा साखर कारखान्यांना एकूण १ हजार ८९८ कोटींचे कर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
Sangram Thopet factory
Sangram Thopet factory esakal
Updated on

Lok Sabha Election 2024: चालू हंगामात भांडवली मदत न झाल्याने बंद ठेवाव्या लागलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्यास महायुती शासनाने आचारसंहितेपूर्वी ८० कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली आहे. मात्र, त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साखरपेरणी केल्याची चर्चा आहे.

महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्यातील तेरा साखर कारखान्यांना एकूण १ हजार ८९८ कोटींचे कर्ज राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून (एनसीडीसी) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अजित पवार गट व भाजपच्या अखत्यारीत असलेल्या कारखान्यांना प्राधान्य दिले.

मात्र, त्यात एक अपवाद करत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या ताब्यातील राजगड कारखाना ठरला. या कारखान्यासदेखील ८० कोटी रुपयांची कर्ज हमी दिली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच राजगड कारखान्यावर ही मेहेरबानी दाखविल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

राजगड कारखाना व्यवस्थापनाने या चालु गळीत हंगामाच्या अगोदरदेखील या कर्जासाठी प्रस्ताव पाठवला होता. मात्र, तो मंजूर झाला नाही. पर्यायाने कारखाना बंद ठेवावा लागला. या दरम्यान राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलामुळे संग्राम थोपटे यांच्या मदतीची महायुतीला गरज असल्याचे लक्षात आल्यावर या वर्षीचा प्रस्ताव मान्य करून मदतीची साखरपेरणी केल्याचे बोलले जात आहे.

आमदार संग्राम थोपटे यांनी महाआघाडीचा धर्म पालन करण्याचे ठरवून बारामतीला लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग सुरू केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना भेटण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी गेले होते. आमदार थोपटे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा मोठा मेळावा भोरमध्ये पार पडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राजगड कारखान्यास मदत झाली आहे.

Sangram Thopet factory
Midcap Stocks: रिझर्व्ह बँकेला का आलं शेअर बाजाराचं टेन्शन? सेबीनेही दिलाय इशारा, नेमकं काय आहे प्रकरण

राजकीय अर्थ काढू नये : थोपटे

याबाबत आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या ‘जीआर’नुसार आजारी कारखान्यांना मदत करण्यासाठी प्रस्ताव मागितले गेले होते. त्यामध्ये ‘राजगड’चा प्रस्ताव होता, मात्र तो मंजूर झाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारच्या ‘एनसीडीसी’साठी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये ‘राजगड’चे नाव घेतले गेले, ही चांगली बाब आहे. (Loksabha Update)

याचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये. कारखान्याची निवड करणाऱ्या समितीने मागील वेळेस पाच प्रस्ताव पाठवले होते, त्यामध्ये दोन काँग्रेसचे कारखाने होते. यावेळी १३ कारखान्यांमध्ये एक काँग्रेसचा कारखाना निवडला गेला, या व्यतिरिक्त यामध्ये कोणताही अर्थ नाही. माझी राजकीय भूमिका मी स्पष्ट केली आहे व त्याप्रमाणे काम करत आहे. त्यामध्ये बदल होण्याचे कोणतेही कारण नाही.

Sangram Thopet factory
Fact Check Unit: केंद्र सरकारला धक्का! 'फॅक्ट चेक' युनिटच्या सूचनेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com