CM Eknath Shinde : मोदींची वक्रदृष्टी पडल्यास फेस येईल; उद्धव ठाकरेंवर निशाणा

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal

पुणे - ‘कोरोना काळात आपण सर्वच जण काम करीत होतो. परंतु काही जण घरात बसून फेसबुक लाइव्ह करीत होते. ते आता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करीत आहेत. आपण काय बोलतो आहे, कोणावर बोलतो आहे, याचा विचार केला पाहिजे. मोदींची वक्रदृष्टी पडली, तर फेसबुक लाइव्ह करणाऱ्यांना फेस येईल,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर गुरुवारी टीका केली. ‘हाती चले बाजार..... तो’ असे सांगून ‘पुढील वाक्य मी पूर्ण करणार नाही,’ असे सूचक वक्तव्यही शिंदे यांनी केले.

महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाआधी अजित पवार यांचे भाषण झाले. त्यांनी ‘महायुतीच्या वक्त्यांनी प्रचारादरम्यान अपशब्द जाणार नाही, यांचे भान ठेवावे,’ असे सांगितले. त्यापाठोपाठ भाषणास उभे राहिलेल्या शिंदे यांनी ‘निवडणुकीत दररोज आरोप-प्रत्यारोप होणारच. परंतु आपल्यावर झालेल्या आरोपांना विकासकामाने उत्तर देणार आहे,’ असे सांगत उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना एका प्राण्याचे नाव देत खिल्ली उडविली.

रावणाचा अंत करा

गेल्या पावणेदोन वर्षांत राज्य सरकारने खूप काम केले, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘हे काम करणारे सरकार आहे. उद्योगधंदे महाराष्ट्रात आणणारे सरकार आहे. आमच्या आधीच्या सरकारच्या (महाविकास आघाडी) काळात सर्व कामकाज ठप्प झाले होते. कोरोना काळात आपण सर्व जण काम करीत होतो.

लोकांचे जीव वाचवत होतो. परंतु काही लोक खिचडी, ऑक्सिजन प्लांट, बॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार करीत होते. राज्यकर्त्यांनी कधीच अहंकार ठेवायचा नसतो. अहंकारामुळे रावण जळून खाक झाला. काँग्रेस रूपी रावणाचा अंत या निवडणुकीच्या निमित्ताने करावयाचा आहे.’

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. कोणीही आपला पराभव करू शकत नाही. तुम्ही गाफील राहिले, तर उमेदवाराचा पराभव होऊ शकतो.

- चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com