Ravindra Dhangekar : वानवडीसाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

‘कॅंटोन्मेट-वानवडी परिसरात खूप सोसायट्या आहेत. या भागात रस्ते लहान आणि वाहने जास्त आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekarsakal

पुणे - ‘कॅंटोन्मेट-वानवडी परिसरात खूप सोसायट्या आहेत. या भागात रस्ते लहान आणि वाहने जास्त आहेत. परिणामी, वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो. हा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीनंतर ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करून त्यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग घेण्यात येईल’, असे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिले.

पुणे कॅंटोन्मेंट-वानवडी भागात धंगेकर यांच्या जीपयात्रा व पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात माजी मंत्री सुनील केदार, डॉ. विश्वजित कदम, सुनाम जांभूळकर, मिलिंद अहिरे, रत्नप्रभा जगताप, प्रफुल्ल जांभूळकर, केविन मॅन्युअल, प्रीती चढ्ढा, रमेश सोनावणे, ओंकार जगताप, रवींद्र जांभूळकर, वेदांत नांगरे, प्रियदर्शनी निकाळजे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या स्कूटरच्या मागे बसून धंगेकर यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या. दरम्यान, लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी विविध संस्था व संघटनांनी धंगेकर यांना पाठिंबा दिला.

शैक्षणिक कर्जमाफीची गॅरंटी दिलासाजनक

‘काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ हमी दिल्या आहेत, त्यातील शैक्षणिक कर्जमाफीची हमी ही ऐतिहासिक स्वरूपाची आहे. त्यातून असंख्य पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे’, असे प्रतिपादन रवींद्र धंगेकर यांनी केले.

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत शैक्षणिक कर्जाच्या माफीची गॅरंटी कोणत्याच राजकीय पक्षांनी दिलेली नाही. त्यामुळे काँग्रेसची ही गॅरंटी ऐतिहासिकही ठरली आहे. त्याखेरीज पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक लाख रुपये मदतीची अप्रेंटिसशिप योजना काँग्रेसने जाहीरनाम्यात सादर केली आहे. त्याचाही देशातील सर्वच पदवी व पदविकाधारक युवकांना लाभ होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com